या वर्षी आडसाली ऊसाची बांधणी सातत्याने पाऊस सुरू असल्याने वेळेवर करता आली नाही ज्या ऊसाची 3.5 महिन्यामध्ये मोठी बांधणी व्हायला पाहिजे होती तो ऊस आज जमिनीमध्ये वापसा नसल्यामुळें 5महिन्यांनी मोठी बांधणी करावी लागत आहे. आतापर्यंत जी रासायनिक खते व सुक्ष्मअन्नद्रवे टाकली आहेत ती सर्व पावसामध्ये वाहून गेले आहेत.त्यामुळे रासायनिक खतांचे शेड्युल परत नव्याने बनवावे लागेल.
सुक्ष्मअन्नद्रवे पूर्वी वापरले असेल तरी देखील मोठ्या बांधणीला आणखीन एकदा वापरावे लागणार आहे.
त्यासाठी मोठी बांधणी करत। असताना सरीच्या एका बाजूला शेणखता मध्ये मिसळून सूक्ष्मअन्नद्रवे टाका व सरीच्या दुसऱ्या बाजूला एकरी 2dap,2युरीया,1पोटॅश हे रासायनिक खत टाकून घ्या.

सुक्ष्मअन्नद्रवे वापरायचे एकरीं प्रमाण खालील प्रमाणे,
झिंक सल्फेट :-10किलो,
फेरस सल्फेट :-10किलो,
मैग्नेशियम सल्फेट:- 25किलो
मैग्निज:- 5किलो,
बोरॉन:- 3किलो
गंधक :- 10किलो
सिलिकॉन:-80किलो

सतत च्या पावसाने ऊसाच्या मुळ्यामध्ये ताकत राहिलेली नाही. ज्या जमिनीमध्ये जास्त पाणी साचून राहते , पाणी बाहेर काढणे शक्य नाही, त्या ठिकाणी अजूनही 4/5कांडीवरती ऊस आहे. ज्या जमिनी बऱ्यापैकी निचरा होणाऱ्या आहेत, त्या ठिकाणी 7/ 8कांडीवरती व जमिनीच्या प्रतीनुसार व पीक फेरपालट केलेल्या जमिनी मध्ये 1जूनला लावण केलेला ऊस 9/10कांडीवरती गेलेला आहे. ते प्लॉट काही ठिकाणी ऊसाची बांधणी करण्या आधीच आडवे झालेले आहेत.त्या ठिकाणी ऊसाची भरणी कसे करायचे असा यक्षप्रश्न आहे.काही ठिकाणी ऊस आडवा झाला नाही परंतु काही ठिकाणी कलायला सुरुवात झाली आहे.तो ऊस कधी आडवा होईल हे सांगता येत नाही. ज्या जमिनीमध्ये वापसा आलेला आहे त्या ठिकाणी ऊसाची बांधणी करत असताना तळातील पाचट पूर्ण पणे वाळलेले असल्यामुळे पाचट ने रोटर भरते. जमीन कडक झाल्याने माती पाहिजे त्या प्रमाणात ऊसाच्या बेटा मध्ये जात नाही.त्यामुळे सरी थोडी उथळ व गवाण पडू शकते.
क्रमशः
श्री. सुरेश कबाडे.
✍️संचालक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999